Wednesday, December 30, 2015

पुण्यमयी दे आम्हां अक्षर वरदान

(पुणे विद्यापीठ गीत)


पुण्यमयी दे आम्हां अक्षर वरदान

ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान

जातिभेद, धर्मभेद, वंशभेद दूर

लाख लाख कंठांतुनि हाच एक सुर

करुणेच्या चरणांशी नत हो विज्ञान


माणुसकीच्या धर्माचा अर्थ जाणतो

श्रमनिष्ठा हे पवित्र तीर्थ मानतो

ह्रद्यांतुनि समतेचा निर्भय अभिमान


सेवेतच मुक्ती ही मंगल दीक्षा

न्यायस्तव जागृती ही सत्वपरीक्षा

हे विश्वची घर आमुचे मंत्र हा महान


- मंगेश पाडगांवकर